Tuesday 16 July 2019

सिझेरियन डिलिव्हरी आणि बाळाचं स्तनपान

सिझेरियन डिलिव्हरी झाल्यामुळे बाळाची आई भूल दिल्यामुळे ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आल्यावर सुरुवातीला काही काळ थोड्याश्या धुंदीत असते, आमच्या बाबतीत देखील तेच झालं आणि बाळाला अंगावर पाजण्यासाठी प्रयत्न देखील केले पण बाळ फारसं पित नव्हतं, आम्हाला डॉक्टर्स आणि काही जाणकार लोकांनी देखील सांगितले की बऱ्याचदा सिझेरियन डिलिव्हरी नंतर माते ला लगेच दूध येत नाही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी येते आमच्या बाबतीत ते तिसऱ्या दिवशी आलं तोपर्यंत बाळाला Dexolac पावडर च दूध बनवून दिलं.
हे पावडर च दूध बनविताना आणि पाजतांना ज्या भांड्यामध्ये किंवा वाटी मध्ये आपण दूध बनवितो आणि पाजतो ती भांडी प्रत्येक फीड नंतर स्वच्छ धुवून गरम पाण्यात टाकून ठेवावी व मगच वापरावी यामुळे बॅक्टरीया होण्यास अटकाव होतो. 
मातेला दूध यायला लागल्यानंतर मात्र स्तनपान वरच भर द्यावा जेणेकरून बाळाला अंगावर पिण्याची सवय होईल व मातेच्या स्तनांमधील दूध निघून जाऊन नवीन दूध तयार होत राहील. सुरुवातीला काही कारणांमुळे बाळ जरी अंगावर पित नसेल तरी हे आधीचे दूध मातेच्या स्तनांमधून पिळून किंवा पंपाने काढून टाकावे किंवा बाळाला पाजावे.
हे दूध जर काढले नाही तर त्याच्या गाठी तयार होऊन आणखी समस्या निर्माण होऊ शकतात.

खूपदा बायका गैरसमज करून घेतात की त्यांना दूध येत नाही त्यामुळे त्या बाळाला अंगावर पाजत नाहीत पण हा त्यावरच उपाय नाहीये उलट जरी कमी दूध येत तरी देखील बाळाला अंगावर पाजलच पाहिजे तुमचं दूध आणण्यासाठी त्याच ओढणं महत्वाचं आहे त्यामुळे बाळाला शक्यतो अंगावर पाजण बंद न केलेलं बर सोबत दुसरं दूध (फॉर्म्युला)  दिल तरी चालतं. त्यासोबत दुधवाढीसाठी योग्य तो आहार किंवा वैद्यकीय उपचार असतील ते केले तरी मदत होईल.

मी इंटरनेटवर विविध हेल्थ साईट्सवर केलेल्या तपासानुसार अगदी लहान किंवा काही महिन्यांच्या बाळाला गायीचं दूध देऊ नये  खूप लोक गायीचं दूध देण्यासाठी आग्रही असतात पण 6 महिन्यानंतर ते ठीक आहे  त्याआधी नको गायीचं दूध त्यातील काही घटकांमुळे बाळाच्या मूत्रपिंड वर परिणाम करते.
सध्या स्तनपाना बाबत इतकीच माहिती देतोय आणखी अपडेट झालं तर नवीन पोस्ट करेल.
-उमेश महाजन

Monday 8 July 2019

माझं बाळ

आपल्या घरात नवीन बाळ जन्माला येणार या बातमीनेच आपण खूप खुश होतो. त्याच्या सोबत चे क्षण त्याच्यासाठी काय करायचं सगळे प्लॅन तयार व्हायला लागतात. आमचं देखील तसंच झालं . पण खऱ्या जबाबदाऱ्या, बाळ जन्माला आल्यानंतर बाळाची घ्यायची काळजी, तेव्हा निर्माण होणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण स्वतः अनुभव करतो त्यावेळी आपल्याला कळतं की नवजात बाळाचं संगोपन आणि काळजी घेणं इतकं सोपं नाहीये. आमच्या बाळाच्या जन्मापासून आम्ही ज्या ज्या गोष्टींना सामोरे गेलो, त्यासाठी   काही माहिती स्वतः  शोधली  अभ्यास केला काही अनुभवी लोकं, डॉक्टर्स यांचे सल्ले या सगळ्यातून जे काही शिकलो समजलो ते मी इथे मांडायचा प्रयत्न करणार आहे जेनेकरुन इतर माता पिताना किंवा ज्यांच्या कडे नवीन बाळ येणार आहे किंवा आलं आहे त्यांना देखील आमच्या अनुभवातून काही शिकत येईल.
बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असतो, अशावेळी सल्ला देणारी जेष्ठ मंडळी असतात पण प्रत्येकाचा सल्ला बरोबर असेलच असे नाही. या ज्येष्ठ लोकांच्या  काही गोष्टी डॉक्टरांना मान्य नसतात तर डॉक्टरांच्या काही गोष्टींवर यांचा विश्वास नसतो. काहीवेळा तर सुशिक्षित असणारे लोक सुद्धा अंधश्रद्ध सल्ले देतात पण या सगळ्यांमध्ये डॉक्टरांचा सल्ला कधीही चांगला. तर आता इथून पुढे मी आम्हाला आलेली एक एक समस्या व तिचे आम्ही शोधलेले समाधान व त्याचा आलेला परिणाम मांडत जाणार आहे, आशा करतो की हे कोणाच्या तरी उपयोगात येईल.