Monday 8 July 2019

माझं बाळ

आपल्या घरात नवीन बाळ जन्माला येणार या बातमीनेच आपण खूप खुश होतो. त्याच्या सोबत चे क्षण त्याच्यासाठी काय करायचं सगळे प्लॅन तयार व्हायला लागतात. आमचं देखील तसंच झालं . पण खऱ्या जबाबदाऱ्या, बाळ जन्माला आल्यानंतर बाळाची घ्यायची काळजी, तेव्हा निर्माण होणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण स्वतः अनुभव करतो त्यावेळी आपल्याला कळतं की नवजात बाळाचं संगोपन आणि काळजी घेणं इतकं सोपं नाहीये. आमच्या बाळाच्या जन्मापासून आम्ही ज्या ज्या गोष्टींना सामोरे गेलो, त्यासाठी   काही माहिती स्वतः  शोधली  अभ्यास केला काही अनुभवी लोकं, डॉक्टर्स यांचे सल्ले या सगळ्यातून जे काही शिकलो समजलो ते मी इथे मांडायचा प्रयत्न करणार आहे जेनेकरुन इतर माता पिताना किंवा ज्यांच्या कडे नवीन बाळ येणार आहे किंवा आलं आहे त्यांना देखील आमच्या अनुभवातून काही शिकत येईल.
बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असतो, अशावेळी सल्ला देणारी जेष्ठ मंडळी असतात पण प्रत्येकाचा सल्ला बरोबर असेलच असे नाही. या ज्येष्ठ लोकांच्या  काही गोष्टी डॉक्टरांना मान्य नसतात तर डॉक्टरांच्या काही गोष्टींवर यांचा विश्वास नसतो. काहीवेळा तर सुशिक्षित असणारे लोक सुद्धा अंधश्रद्ध सल्ले देतात पण या सगळ्यांमध्ये डॉक्टरांचा सल्ला कधीही चांगला. तर आता इथून पुढे मी आम्हाला आलेली एक एक समस्या व तिचे आम्ही शोधलेले समाधान व त्याचा आलेला परिणाम मांडत जाणार आहे, आशा करतो की हे कोणाच्या तरी उपयोगात येईल.

No comments:

Post a Comment